---Advertisement---

राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने अक्कलकोट तालुक्याची नुतन कार्यकारणी जाहीर; आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रासप सज्ज : बंडगर

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट,दि.३१ : राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने दिवाळी तोंडावर आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहर व तालुक्याची बैठक साहिल पॅलेस येथे पार पडली. बैठकीत नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा आढावा घेण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष सुरेश गुत्तेदार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दत्ता माडकर, शहर अध्यक्ष स्वामीराव घोडके, युवक तालुका अध्यक्ष दाजी कोळेकर, तालुका उपाध्यक्ष पिंटू गावडे, अक्कलकोट विधानसभा अध्यक्ष शिवानंद गाडेकर, संपर्क प्रमुख राजशेखर बिराजदार, तालुका प्रसिद्धी प्रमुख संतोष शिंदे, अल्पसंख्याक आघाडीचे शहर
अध्यक्ष यासीन शेख आदी उपस्थित होते.

यावेळी काशिनाथ निंबाळ यांची अक्कलकोट तालुका कार्याध्यक्ष, तिपण्णा घोडके – अक्कलकोट तालुका उपाध्यक्ष, बिरु बंदिछोडे – अक्कलकोट तालुका युवक आघाडी उपाध्यक्ष, सिध्दाराम तोरणी – मैंदर्गी शहर अध्यक्ष, रेवणसिध्द शेरी – सलगर जिल्हा परिषद गट प्रमुख, सिध्दाराम काळे- तोळणूर पंचायत समिती गण प्रमुख, बिरप्पा आळगी – नागणसुर जिल्हा परिषद गट प्रमुख, सैपन जमादार – अल्पसंख्याक आघाडी युवक आघाडी तालुका अध्यक्ष यांना पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर आणि तालुका अध्यक्ष सुरेश गुत्तेदार यांच्या हस्ते नियुक्तीपञ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना सुनील बंडगर म्हणाले की आगामी होणाऱ्या नगरपंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी चर्चा करण्यासाठी ही महत्त्वाची बैठक होती.पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्षाच्या किमान १ हजार शाखेचे नियोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने अक्कलकोट तालुक्यातील ५० गावामध्ये नोव्हेंबर अखेर रासपची शाखा काढण्याचा संकल्प करण्यात आला.

येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाची विजयी घौडदौड चालु ठेवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला सुरुवात करुन माजी मंत्री महादेव जानकर यांचे हात बळकट करण्यासाठी तयारीला लागा, असे आवाहन बंडगर यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!