---Advertisement---

हालहळ्ळीच्या तंटामुक्त अध्यक्षपदी गुरूनाथ कळमंडे यांची निवड

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.३१ : हालहळ्ळी (अ) ता.अक्कलकोट येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी गुरूनाथ कळमंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच प्रकाश बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली.

व्यासपीठावर उपसरपंच सिध्दाराम सुतार, ग्रा.प.सदस्या विजयालक्ष्मी सुतार,रेखा बिराजदार, रत्नाबाई वाघमारे, गंगाधर वळदड्डे, गजानन बिराजदार, रेवणप्पा बिराजदार, मल्लिनाथ बिराजदार, नागनाथ बिराजदार, हणमंत बिराजदार, शिवप्पा वळदड्डे, चंद्रकांत कळमंडे, हणमंत कळमंडे,गजानन बिराजदार, राजू धनशेट्टी, हणमु बिराजदार, रामू बोराळे आदी उपस्थित होते.

निवडीनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नुतन अध्यक्ष गुरूनाथ कळमंडे यांचा सत्कार करण्यात आला.यापुढील काळात गावातील तंटे गावातच मिटविण्यावर आपला भर असेल, असे कळमंडे यांनी सांगितले.सुत्रसंचालन गंगाधर वळदड्डे
यांनी तर आभार सरपंच प्रकाश बिराजदार यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!