---Advertisement---

त्रिपुरारीनिमीत्त वटवृक्ष स्वामींना फळांची सजावट, परगावाहून आलेल्या दिंडी व पालखी परिक्रमांचे महेश इंगळेंनी केले स्वागत

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि. १८ नोव्हे – त्रिपुरारी पौर्णिमेस श्री वटवृक्ष मंदिरात अनन्य साधारण महत्व असून या निमित्त अनेक भाविक आज येथील वटवृक्ष निवासी स्वामीं चरणी नतमस्तक झाले. श्री वटवृक्ष मंदिरातील स्वामींच्या मुर्तीस त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त आकर्षक विविध फळांनी, सुवर्ण हार, टोपने सजावट करण्यात आले होते.

सायंकाळी हजारो दिव्यांच्या दिपोत्सवाने वटवृक्ष स्वामींचे मंदिर उजळून निघाले. प्रारंभी आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पहाटे पाच वाजता  व साडेअकरा वाजता मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरोहित मोहन पुजारी, मंंदार पुजारी यांच्या हस्ते अनुक्रमे श्रींची काकड आरती व नैवेद्य आरती संपन्न झाली.

याप्रसंगी पुणे येथील स्वामी भक्त सुयोग झेंडे यांच्या वतीने महेश इंगळे यांच्या हस्ते भाविकांना फळांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर राज्याच्या पुणे, सातारा, मालेगाव, बार्शी, जेजुरी, उस्मानाबाद, सोलापूर, मोहोळ, कोल्हापूर आदी विविध भागातून दिंडी सोबत पायी चालत येणारे पालखी सोहळे वटवृक्ष मंदिरात दाखल झाले. याप्रसंगी या दिंडी व पालखी सोहळ्याचे स्वागत मंदिर समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी केले.

या दिंडी व पालखीसोबत पायी चालत येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या वतीने देवस्थानच्या भक्तनिवास येथे भोजन महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. आलेल्या सर्व स्वामी भक्तांनी या भोजन महाप्रसादाचा लाभ घेतला.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वामी भक्तांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाच्या सर्व नियम व अटींचे पालन करून स्वामी भक्तांना मंदिरात टप्प्याटप्प्याने दर्शनाकरिता सोडण्यात आले. कोरोना संबंधित नियमावलीचे मंदिर समितीकडून सातत्याने अनाउन्समेंट द्वारे सूचना देण्यात आल्या. दिवसभर टप्प्याटप्प्याने अनेक स्वामी भक्तांनी दर्शन घेऊन कृतार्थ झाले.

मंदीर समितीच्या वतीने मंदीरातील विविध परिसरात भाविकांना सॅनिटायझरची सोय करण्यात आली होती. येणारे प्रत्येक भाविक हे मंदीर समितीच्या सेवेकऱ्यांच्या सुचनेची दखल घेवून सॅनीटायझरचा वापर व सोशल डिस्टन्सींगचे पालन करून टप्प्या टप्प्याने स्वामींचे दर्शन घेतले.

सर्व भाविकांचे दर्शन सुलभतेने होण्याकरीता समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त पदाधिकारी व कर्मचारी सेवक वर्गाने परिश्रम घेतले. याप्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी भाविकांना सुलभ व त्वरीत दर्शन होण्यासंदर्भात मंदिर समिती कडून काळजी घेतली असून मंदिर समितीच्या वतीने मास्क, सॅनीटायझर, सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीचा अवलंब करून दर्शनाकरिता सोडण्यात आले. त्याचा लाभ भाविकांना सुरक्षित पणे दर्शन घेऊन माघारी जाण्यात झाला. भाविकांना त्वरीत टप्प्याटप्प्याने दर्शनास सोडून गर्दी टाळण्यासाठी प्राधान्य दिले असल्याचे स्पष्टीकरणही इंगळे यांनी केले.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!