---Advertisement---

गोवा निवडणूक प्रचार समितीत आमदार सचिन कल्याणशेट्टी

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : गोवा राज्याची निवडणूक प्रक्रिया ही येत्या जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे. त्यासाठी तेथील वेगवेगळ्या मतदार संघासाठी प्रचार समिती गठीत करण्यात आली असून त्या समितीत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची निवड करण्यात आली आहे.

गोवा निवडणुकीत प्रभारी हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी या निवडणुकीसंबंधी महाराष्ट्रातील प्रमुख नेते व कार्यकर्ते यांची फळी तयार केली असून त्यांची बैठक घेतली असून त्यातून या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला तिथे मदत व्हावी व पक्षाची सत्ता पुन्हा यावी यासाठी विविध नियोजन केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे आमदार,पदाधिकारी यांच्यावर वेगवेगळ्या मतदार संघाच्या संदर्भात निवडणुक प्रचार प्रक्रियेत सहभाग राहणार असल्याने ही निवड करण्यात आली आहे.

सचिन कल्याणशेट्टी यांचे नेतृत्व कौशल्य आणि संघटन कौशल्य चांगले असल्याने तसेच तरुण नेतृत्व असल्याने त्यांनी अक्कलकोटला भाजप पक्षीय आणि संघटनात्मक पातळीवर मजबूत बांधणी केल्याने गोवा येथील आपल्या पक्षाच्या उमेदवारांना देखील या अनुभवाचा लाभ व्हावा या हेतूने ही निवड करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात ते गोवा येथील निवडणुकीच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या मदतीसाठी लक्ष घालून आपले योगदान देणार आहे, असे आमदार कल्याणशेट्टी यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!