---Advertisement---

फारूक सुतार यांची अक्कलकोट तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक च्या कार्यालायीन प्रमुख पदी निवड

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाचे अक्कलकोट तालुका कार्यालयीन प्रमुख म्हणून विद्यमान प्रसिद्धी प्रमुख असलेले फारुक सुतार यांची निवड करण्यात आली आहे. या संबंधी चे नियुक्ती पत्र फारुक सुतार यांना राष्ट्रवादी अल्पसंख्याकचे जिल्हा उपाध्यक्ष इस्माईल फुलारी, तालुका अध्यक्ष चांद पठान, तालुका अध्यक्ष दिलीप भाऊ सिद्धे, यांच्या हस्ते देण्यात आले.

फारुक सुतार हे गेल्या काही वर्षापासुन पक्षाशी जोडले गेले आहेत, आणि त्यांनी अल्पसंख्याक आघाडी च्या माध्यमातून चांगले काम केले आहेत, त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर पुन्हा दुसरी जबाबदारी टाकली आहे, त्यांची समाजात व बाहेर मोठी ताकद असुन त्याचा फायदा राष्ट्रीवादी पक्षाला होईल, असे तालुका अध्यक्ष दिलीप भाऊ सिद्धे, या वेळी म्हणाले.

राष्ट्रवादी अल्पसंख्याकचे जिल्हा उपाध्यक्ष इस्माईल फुलारी, ओबीसी विभागाचे तालुका अध्यक्ष स्वामीनाथ पोतदार, माणिक बिरारदार, चॉद पठाण, फारुक सुतार, प्रकाश सुरवसे,पीरपाशा पिरजादे, गणेश कांबळे,शंकर व्हनमाने, श्रीनिवास सिंदगीकर,राम जाधव आदीसह कार्यक्रते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!