---Advertisement---

देगाव-एकरुख सिंचन योजनेच्या उर्वरित कामासाठी 575 कोटी रुपये निधी राज्यसरकारने द्यावा ; आमदार कल्याणशेट्टी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी

Follow Us:
---Advertisement---

 

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.२७ : मुंबई येथे सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू आहे.या अधिवेशनात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरणारी देगाव सिंचन सिंचन प्रकल्पाला 450 कोटी आणि एकरुख सिंचन प्रकल्पाला 125 कोटी रुपये असे एकूण या प्रकल्पांना 575 कोटी रुपयांची निधी राज्य सरकारने त्वरित देऊन ही योजना पूर्णत्वास नेण्याची मागणी आज हिवाळी अधिवेशनात केली .त्याचबरोबर चालू वर्षी देगाव एक्सप्रेसला 70 कोटी आणि एकरुख प्रकल्पाला 35 कोटी रुपये प्रस्तावित असताना ,कोविडमुळे त्यातही 40 टक्के निधी कपात करण्याची सूचना राज्य शासनाने केली होती, ती कपात न करता चालू वर्षाचा पूर्ण निधी सरकारने द्यावा,ही मागणीही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विधानसभेत केली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!