---Advertisement---

अक्कलकोट येथे उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन; राष्ट्रवादी काँग्रेसचा उपक्रम

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : राष्ट्रवादी काँग्रेस अक्कलकोट  व विनायक हॉस्पिटल वारजे
(पुणे )यांच्या संयुक्त विद्यमाने अक्कलकोट येथे रविवार दि.९ जानेवारी रोजी स्त्रीरोग व पोटाच्या विकारावरील आजारांचे दुर्बिणद्वारे पोटाची मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.वेंकटेश्वर मंदिर वडार चौक हन्नुर रोड बुधवार पेठ अक्कलकोट येथे सकाळी १० ते दुपारी ४ वेळेत पार पडणार आहे.

पुणे येथील प्रसिद्ध विनायक हॉस्पिटल हे सामाजिक बांधिलकी जपत आतापर्यंत अनेक शिबीर यशस्वीपणे पार पाडले आहेत.गरजूना मोफत मार्गदर्शन यासारखे अनेक उपक्रम विनायक हॉस्पिटल डॉक्टर व कर्मचारी अतिशय नेटाने करत आहेत. यामुळे विनायक हॉस्पिटल वारजे पुणे येथे संपूर्ण महाराष्ट्रातून गरजू लोक भेट देतात अशा तज्ञ डॉक्टरांची टिम अक्कलकोटमध्ये येत आहे.

हर्निया,पित्ताशयातील खडे, पित्ताशय वरील विविध त्रास, मुळव्याध,थायरॉईड ,पोटाचे विकार,फक्त स्त्रियांसाठीगर्भाशयातील गाठी, स्तन कॅन्सर,श्वेत पदर व स्त्रियांचे कॅन्सर आदि आजारावर मोफत मार्गदर्शन व तपासणी होणार आहे.या शिबीराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांच्या हस्ते होणार आहे.

शहर उपाध्यक्ष स्वामीनाथ चौगुले यांनी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गरजूंनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन चौगुले यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!