---Advertisement---

दुधनी सिद्धरामेश्वर यात्रा रद्द, फक्त धार्मिक विधीच होणार

Follow Us:
---Advertisement---

दुधनी दि. ११ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा महोत्सव राज्यात कोरानाचा पादुर्भाव असल्याने रद्द करण्यात आले असुन मंदिरातील धार्मिक कार्यक्रम मोजक्याच मानकरी – सेवेकरी मंदिर समितीच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहेत.

दरवर्षी मकर संक्रांत निमित्त दुधनीत ग्रामदैवत शिवयोगी सिध्दरामेश्वरांची यात्रा भरविण्यात येते. यंदाच्या वर्षच्या यात्रेला बुधवार दिनांक १२ तारखेपासुन होणार होती. परंतु यंदा राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमीक्रोनच्या प्रादुर्भाव असल्याने प्रेक्षणीय शोभेचे दारुकाम, जनावरांचा गड्डा, प्रसिद्ध मल्लांच्या कुस्त्या होणार नसल्याची माहीती देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष श्री चंद्रकांत येगदी यांनी सांगितले. त्याचबरोबर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सामाजिक अंतर, मास्क, कोरोना विरोधी लसींचे दोन डोस बंधनकारक करण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!