---Advertisement---

अक्कलकोट नगरपरिषदेत ११० सफाई कर्मचा-यांची आरोग्य तपासणी

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट,दि.१२ : अक्कलकोट नगरपरिषदेमार्फत स्वामी विवेकानंद जयंती आणि जिजाऊ माता जयंती याचे औचित्य साधुन ११० सफाई कर्मचा-यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.यात अक्कलकोट शहरातील विविध डॉक्टरांनी योगदान दिले.
शासनाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अभियान सुरु केले आहे.यात अक्कलकोट नगरपरिषदेने सहभाग नोंदविला आहे. यामध्ये नगरपरिषद सफाई कर्मचा-यांची आरोग्य तपासणी करणे ही बाब देखील अंतर्भुत आहे. त्या अनुषंगाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

तपासणीसाठी अक्कलकोट शहरातील नामवंत डॉ.प्रदिप घिवारे, डॉ.विपुल शहा, डॉ. राघवेंद्र पाटील, डॉ. उंबराणीकर हे उपस्थित होते.या डॉक्टरांमार्फत अक्कलकोट नगरपरिषदेच्या आस्थापनेवरील व खाजगी मक्ता पध्दतीने लावलेल्या कर्मचा-यांची तपासणी करण्यात आली. यावेळी कोरोनासंबंधी सर्व नियम पाळून तपासणी करण्यात आली.

यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सचिन पाटील, कार्यालय अधिक्षक मलिक बागवान, आरोग्य, निरीक्षक वैशाली नन्ना, आरोग्य विभाग कर्मचारी एन.यु.एल.एम.चे सहा.प्रकल्प अधिकारी चंद्रकांत धेंडे व आरोग्य विभाग कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी पाटील यांनी सफाई कामगारांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!