---Advertisement---

मकर संक्रांतीनिमित्त गळोरगीत १२४ जणांचे रक्तदान

Follow Us:
---Advertisement---

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी येथे श्री रेवणसिध्देश्वर यात्रा महोत्सव निमित् गोपाबाई दमाणी रक्तपेढी, अश्विनी ब्लड बँक सोलापूर व हेडगेवार रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात १२४ जणांनी रक्तदान केले.

गळोरगी ग्रामस्थ दर वर्षी मकर संक्रांत व श्री रेवणसिध्देश्वर यात्रा महोत्सव निमित्त शिबिराचे आयोजन करून गळोरगी ग्रामस्थांनी आदर्श निर्माण केला आहे. या शिबिराचे उदघाटन सरपंच वहिदपाशा शेख यांच्या हस्ते करण्यातआले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील सुरेश मैंदर्गी हे होते. प्रास्ताविक व सुत्रसंचालन रेवणसिद्ध कौटगी यांनी केले.

यावेळी बसवराज पाटील, काशिनाथ प्रचंडे, भिमाशंकर आजुरे,गुरुशांत अदोंडगी, शिवशरण प्रचंडे,शरणय्या स्वामी, मल्लप्पा बडदाळे, पंडित जकापुरे, मलकण्णा संगापुरे, राजू झग्गे, गुरुशांत बिराजदार, गुंडप्पा बिराजदार, शिवानंद बगले आदि उपस्थित होते. या रक्तदान शिबीराचे आयोजन सिद्धेश्वर बिराजदार, गुरूलिंग प्रचंडे, राजू कौटगी यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन काशिनाथ बणजगोळे यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!