---Advertisement---

आघाडी करण्यासाठी उद्या गोव्यात राष्ट्रवादी व शिवसेनेची बैठक – नवाब मलिक

Follow Us:
---Advertisement---

मुंबई दि. १७ जानेवारी – शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी उद्या गोव्यात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि मंत्री जितेंद्र आव्हाड जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.दरम्यान उद्या शिवसेनेसोबत जी अंतिम चर्चा होईल तो निर्णय गोव्यात प्रफुल पटेल जाहीर करतील अशीही माहिती नवाब मलिक यांनी दिली.

उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत आघाडी झाली आहे. मणीपूरमध्ये कॉंग्रेससोबत आघाडी आहे. गोव्यात स्थानिक पातळीवर कॉंग्रेसने आघाडी न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा सुरू आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!