---Advertisement---

मालेगावात कॉंग्रेसला पडले मोठा भगदाड, महापौरांसह २८ नगरसेवकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : मालेगावात कॉंग्रेसला राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोठा खिंडार पाडला आहे. यामुळे राज्यातील महाविकास आघाडीत बिघाडी होतय की काय?  अशी शंका येत आहे. मालेगावच्या महापौर ताहिरा शेख यांच्यासह २८ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी अजित पवार यांनी राज्यात तीन पक्षांची मिळून आघाडीचे सरकार असले तरी आपल्याला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे असे सांगीतले.

राज्यात एकीकडे तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आहे. पण असे असले तरीही या तीनही पक्षात सारे काही आलबेल नसल्याचे सातत्याने दिसून येत आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार,  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!