---Advertisement---

सामाजिक कार्यकर्ते डॉ.मिलिंद भोई यांचा उद्या अक्कलकोटमध्ये सत्कार

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२९ : पुणे येथील नामवंत डॉक्टर तथा अनेक पुरस्कार प्राप्त, समाजिक कार्यकर्ते डाॅ. मिलिंद भोई यांचा
उद्या ( रविवारी ) अक्कलकोट शहरात नागरी सत्कार सोहळा होणार आहे,अशी माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी दिली.दुपारी ३ वाजता सर्जेराव जाधव सभागृह अक्कलकोट येथे हा सोहळा पार पडणार आहे.

हा सत्कार सोहळा दिलिप सिद्धे मित्र परिवार व भोई समाज बाधंवाच्यावतीने आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ. भिमाशंकर बिराजदार हे राहणार आहेत.

माजी कुलगुरू डाॅ. ईरेश स्वामी यांच्या हस्ते माजी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ लांडगे, बाबासाहेब पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम होईल.तरी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!