---Advertisement---

सिंह कधीही गिधाडांच्या धमकीला घाबरत नाही, संजय राऊतांनी आपलं म्हणणं न्यायालयात मांडावं – देवेंद्र फडणवीस

Follow Us:
---Advertisement---

गोवा : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. सिंह कधी गिधाडांच्या धमक्यांना घाबरत नाही, असं विधान फडणवीस यांनी आज गोव्यात केलं. गोवा येथे आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते.

केंद्र सरकारने कोणावरही अन्यायकारक कारवाई केलेली नाही. संजय राऊत दररोज सकाळी बोलून सर्वांचे मनोरंजन करत असतात. त्यांईच्या विधानांना फार महत्त्‍व देण्याबची गरज नाही, माध्यमांमध्ये चर्चेत राहण्या्साठी ते बोलतात. नेमके कोणते विधान केली की, बातमी होते याची त्यांना माहिती आहे.कारण ते संपादक आहेत. त्या‍मुळे केवळ चर्चेत राहण्यासाठी ते बोलत असतात. अशा विधानांना आम्हीं महत्व देत नाही, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!