---Advertisement---

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी लिहिलं केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र, सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यावरुन सनसनाटी आरोप

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरुन सनसनाटी आरोप केला आहे. याप्रकरणी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी मॉब लिचिंग करुन किरीट सोमय्या यांची हत्या करायचा कट होता, असा गंभीर आरोप केला आहे. यामुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेमध्ये हल्ला झाला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला हा एक जाणीवपूर्वक रचलेला कट असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यंनी केला आहे. तसेच याप्रकरणी आता केंद्राने जातीने लक्ष घालावे आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटलांनी पत्रात लिहिले की, सत्तेचा दुरुपयोग करून बंगाल आणि केरळसारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण केली जात आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शाह यांनी महाराष्ट्रात लक्ष केंद्रीत करावे. अमित शाहांनी महाराष्ट्राच्या डिजीला विचारणा करावी, की असे कसे घडलेय? किरीट सोमय्यांवर हल्ला झाला त्यावेळी केंद्रीय सुरक्षा दलाच्या पोलिसांना देखील धक्काबुक्की करण्यात आली होती. सरकारी कामात व्यत्यय आणण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केलीच पाहिजे. असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!