---Advertisement---

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्या अक्कलकोट दौऱ्यावर

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२० : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर उद्या मंगळवार दि.२२ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अक्कलकोट दौऱ्यावर येत आहेत.त्यांच्या उपस्थितीत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक व कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी दिली.पाटील यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट येथील विश्रामग्रह येथे राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.या मेळाव्याला पालकमंत्री दत्तात्रय भरणे,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे,कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील,आमदार यशवंत माने, प्रदेश उपाध्यक्ष दिपक साळुंखे पाटील,राजेंद्र हजारे,लतीफ तांबोळी यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.प्रारंभी सोलापूर रोडवरील महावितरण कार्यालयाजवळ भव्य स्वागत त्यानंतर दुपारी १ वाजता अक्कलकोट बस स्टँड जवळील श्री मल्लिकार्जुन मंगल कार्यालयात ही बैठक होणार आहे.

या मेळाव्यात अक्कलकोट शहर व तालुक्यातील राष्ट्रवादी वाढीसंदर्भात चर्चा व नियोजन करण्यात येणार आहे.त्यात जिल्ह्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन होणार आहे.तरी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.यावेळी जिल्हा सरचिटणीस

प्रा.प्रकाश सुरवसे, तालुका सरचिटणीस शंकर व्हनमाने, कार्याध्यक्ष माणिक बिराजदार,शहर उपाध्यक्ष स्वामीनाथ चौगुले, युवा नेते शिवराज स्वामी,उपाध्यक्ष महादेव वाले,युवा नेते बसवराज बाणेगाव,पदवीधरचे अध्यक्ष राजरतन बाणेगाव,जिल्हा उपाध्यक्षा सुरेखा पाटील,अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष इस्माईल फुलारी,शहर युवक अध्यक्ष आकाश कलशेट्टी,संजय घोडके, युवक तालुकाध्यक्ष शंकर उर्फ बंटी पाटील,फारूक सुतार,मोहसीन नदाफ,गुरूदेवी कानडे,जिल्हा संघटक विक्रांत पिसे,अविराज सिद्धे ,श्रीशैल चितली आदी
उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!