---Advertisement---

मिरजगी प्रशालेच्या शालेय समितीच्या चेअरमनपदी माणिक साळुंके

Follow Us:
---Advertisement---

 

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.७ : फत्तेसिंह शिक्षण संस्था अंतर्गत अक्कलकोट तालुक्यातील मिरजगी प्रशालेच्या शालेय समितीच्या चेअरमनपदी माणिक साळुंके यांची निवड करण्यात आली.
या संस्थेची नुकतीच निवडणूक पार पडली. त्यानंतर प्रत्येक संस्थेच्या चेअरमनपदी निवड करण्यात येत आहेत. संस्थेचे नूतन अध्यक्ष राजीव माने यांनी ही घोषणा केली. साळुंके हे गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेचे सभासद आहेत.या समितीत लक्ष्मण मचाले, रमाकांत राजापुरे, अक्षय मोरे हे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आले आहेत.मिरजगी प्रशालेच्या हितासाठी व प्रगतीसाठी काम करणार असल्याचे साळुंके यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले. निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजीव माने, उपाध्यक्ष प्रल्हाद जाधव व संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!