---Advertisement---

अक्कलकोट वीरशैव विश्व संघटनेच्या अध्यक्षपदी नीलकंठ कापसे

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट,दि.३०: वीरशैव विश्व संघटनेच्या
नूतन अध्यक्षपदी नीलकंठ कापसे यांची तर उपाध्यक्षपदी श्रीकांत झिपरे यांची निवड करण्यात आली.सचिव म्हणून महेश जवळगी यांची निवड करण्यात आली आहे.वीरशैव विश्व या सामाजिक संघटनेची सहविचार सभा लोकापुरे हॉल मध्ये संपन्न झाली.यावेळी नूतन पदाधिकारी निवड करण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी उद्योजक तथा विश्वस्त प्रमोद लोकापुरे होते.प्रारंभी संघटना प्रमुख अभिजित लोके यांनी प्रस्ताविकेतून सर्वांचे स्वागत करून पदाधिकारी निवड व कार्य रचनेबाबत माहिती दिली .विश्वस्त मंडळ सदस्य सुनील बिराजदार,शशिकांत लिंबीतोटे,लक्ष्मण समाणे,वीरेंद्र पाटील,विद्याधर गुरव,सुधीर माळशेट्टी,राजशेखर उमराणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व सदस्यांनी विचारविनिमय करून सर्वानुमते दोनवर्षासाठीचे पदाधिकारी मंडळ निवड करण्यात आले. नूतन सहसचिव-बाबूराव रामदे,खजिनदार-अशोक कलशेट्टी,सहखजिनदार-व्यंकटेश होटकर,कार्यकारिणी सदस्य-गुरुशांत स्वामी,संजय भागानगरे,शिवशंकर कुंभार,रवी मलवे, दशरथ हरवाळकर यांची निवड करण्यात आली.
नूतन अध्यक्ष व पदाधिकारी मंडळाचा सत्कार मावळते अध्यक्ष सुधीर माळशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.या सभेस रामेश्वर पाटील,प्रदीप हिंडोळे,मल्लिनाथ पाटील ,सुरेश भास्कर,लक्ष्मीकांत पाटील,आनंद गंदगे,शिवकुमार पाटील,शशिकांत कडगंची,शिवानंद कारले,मल्लिनाथ माळी, भारत गवळी,रितीक लिंबितोटे आदी उपस्थित होते.नूतन अध्यक्ष कापसे यांनी नवनियुक्त पदाधिकारीच्यावतीने सर्वांचे आभार मानले

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!