---Advertisement---

मैंदर्गी सोसायटी निवडणूकीत महेश शावरी व सुरेश नागूर गटाचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी,विरोधकांचा धुव्वा

Follow Us:
---Advertisement---

 

सचिन पवार

अक्कलकोट, दि.१९ : मैंदर्गी सोसायटी निवडणूकीत युवा नेते महेश शावरी व सुरेश नागूर यांचे सर्वच्या सर्व तेरा उमेदवार विजयी झाले.यात विरोधकांचा अक्षरशः धुव्वा उडाला.अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था
मर्यादित मैंदर्गी प्रथमच निवडणूक लागली होती.ती प्रतिष्ठेची करण्यात आली होती. नगरपालिका निवडणुका तोंडावर आहेत.या पार्श्वभूमीवर शावरी यांनी विरोधकांना धक्का देत यशाची चुणूक दाखवली
आहे.या निवडणुकीत शेतकरी परिवर्तन पॅनेलचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले आहेत.विजयी जल्लोष करताना एम एस युथ फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष महेश शावरी व सुरेश नागूर या दोघे पॅनल प्रमुखांना खांद्यावर घेऊन जल्लोष करण्यात आला.
मैंदर्गी गावातील शेतकऱ्यांना सोसायटी निवडणूक एकदाही झाले नसल्याने सोसायटी निवडणूक कशी असते.एकाही शेतकऱ्यांना माहीत नव्हते.यंदाची निवडणूक लागल्याने निवडणूक कशी असते,हे शेतकऱ्यांना कळले. निवडणूक जिंकल्यानंतर उमेदवार सुनील बंडगर यांच्यासह अन्य उमेदवारांनी जल्लोष केला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!