---Advertisement---

दहिटणे विकास कार्यकारी सोसायटीवर गोकुळ शिंदे यांचे निर्विवाद वर्चस्व

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२६ : अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथील विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत जेष्ठ नेते गोकुळ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामदैवत शिलारसाहेब शेतकरी विकास पॕनेलचे
निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत सर्व उमेदवार भरघोस मताने निवडून आले.यात विरोधी पंडित मोरे गटाचा दारुण पराभव झाला.नूतन संचालक गोकुळ शिंदे ,विष्णू मोरे, गोकुळ मोरे,मोहन राजेगावकर,सोमण्णा माळी,सिद्धाराम कुंभार,सखाराम मोरे,
हसन नदाफ,नागनाथ खांडेकर,हर्षवर्धन सोनकांबळे,अनिता गजाकोस, आशाबाई पाटील हे निवडून आले तर बालाजी पाटील हे यापूर्वी बिनविरोध झाले.सर्व नूतन संचालकांचे गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिले. सभासदांनी टाकलेला विश्वास आपण नक्की सार्थ ठरवू, असे अभिवचन शिंदे यांनी यावेळी दिले .याप्रसंगी चुंगीचे सरपंच राज चव्हाण,महेश माने,हरूण नदाफ,धनराज व्हट्टे,शार्दूल रसनभैरे,दिगंबर राजेगावकर, दौलत मोरे, एकनाथ शिंदे ,बाळराजे लोंढे पाटील, श्रीमंत राजेगावकर ,विजय शिंदे ,रमेश स्वामी, चंद्रकांत माळी, महम्मद मुजावर, श्रीशैल कुंभार, बाबासाहेब मोरे ,श्रीकांत चौधरी यांच्यासह गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी,युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!