मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील
गाडीला अपघात; मुख्यमंत्री सुखरूप
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यातील दोन वाहनांचा काल रात्री उशीरा अपघात झाला. मुंबई महानगरपालिकेजवळ मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा किरकोळ अपघात झाला असून त्यामध्ये कोणीही जखमी झालेली नाही. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री शिंदेही सुखरुप आहेत. मंगळवारी रात्री साडेअकराच्या आसपास हा अपघात झाला.काही वेळापूर्वी याबाबतची माहिती समोर आली आहे.