---Advertisement---

हाफ मॅरेथॉन स्पर्धेत एका धावपटूचा दुर्दैवी मृत्यू

Follow Us:
---Advertisement---

सातारा : सातारा जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत एका धावपटूचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राज पटेल असं मयत धावपटूचं नाव असून तो ३२ वर्षांचा आहे. मयत धावपटु कोल्हापूरचा रहिवासी आहे. याशिवाय राज पटेल यांच्याह तीन धावपटूही जखमी झाले आहेत. त्यामुळं या घटनेमुळं साताऱ्यात खळबळ उडाली असून धावपटू राज पटेल मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळं झाला, याची माहिती अजून समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यात हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होता. या स्पर्धेत ७ हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला होता. त्यात कोल्हापूरच्या राज पटेल यांनीही सहभाग घेतला होता. परंतु त्यांना मॅरेथॉन स्पर्धेत धावत असताना अचानक चक्कर आले आणि ते खाली पडले. त्यामुळं त्यांच्यासोबत धावत असलेल्या धावपटूंना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी राज पटेल यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. परंतु डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!