---Advertisement---

चपळगावात गुरुवारी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण; पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा होणार सन्मान

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.१९ : चपळगाव (ता.अक्कलकोट) येथील सीसीटीव्हीचे लोकार्पण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते गुरुवार दि.२२ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त अन्य काही कार्यक्रम पण होत आहेत,अशी माहिती सरपंच उमेश पाटील यांनी दिली.

प्रारंभी सकाळी ११ वाजता चपळगाव येथे गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी आणि लोकार्पण होईल. बालाजी अमाईन्सचे राम रेड्डी यांच्या सहकार्यातून व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यावेळी पोलीस अधीक्षक सातपुते यांच्या परिवर्तन मोहिमेला चांगले यश मिळाल्यामुळे आणि त्यांचा लौकिक राष्ट्रीय पातळीवर झाल्यामुळे सत्काराचे नियोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच उमेश पाटील राहणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते तम्मा गजधाने व मित्र परिवाराकडून गुणवंत व गरजूंना साहित्य वाटप देखील करण्यात येणार आहे. या सन्मान सोहळ्याला परिसरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!