---Advertisement---

संजयकुमार गंगदे यांना जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार प्रदान

Follow Us:
---Advertisement---

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.२० : महाराष्ट्र शिक्षक संघ संलग्न सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर येथील एच. जी. प्रचंडे माध्यमिक प्रशालेतील शिक्षक संजयकुमार गंगदे यांना देण्यात आला.

सांगोला येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंके पाटील यांच्या हस्ते देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्यकारणी सदस्य प्रबुद्धचंद्र झपके, भाऊसाहेब रुपनूर, सागर पाटील, शिवाजीराव जमाले, मिलिंद साळुंखे, हरिदास जाजनुरे, धानप्पा हासरमनी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

गंगदे यांनी आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न करत असतात. पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष व सर्व संचालक, प्राचार्य सिद्धाराम सोलापुरे आदींनी अभिनंदन केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!