---Advertisement---

विभागीय नेहरू हॉकी स्पर्धेत अक्कलकोट येथील इंडियन मॉडेल स्कूलचे यश

Follow Us:
---Advertisement---

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट,दि.६ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा संचलनालय पूणे यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी (पुणे) येथे
आयोजित करण्यात आलेल्या १७ वर्षाखालील विभागीय नेहरू हॉकी स्पर्धेत अक्कलकोट येथील इंडियन मॉडेल स्कूलने तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले.

विजयी संघातील खेळाडू – सिद्धनाथ शिंपाळे (कॅप्टन), समर्थ देवर (गोलकीपर), समर्थ गुरव, योगश स्थावरमठ,आदित्य कांबळे, आदित्य राठोड, आदित्य कुंभार, प्रथमेश जोगदे, पृथ्वी लोकापूरे, शरणराज मेंथे, सोहम गोंडाळ,मंथन आडवितोटे, समर्थ फुलारी, नाविद बटवेगार, अनिकेत बिराजदार, विक्रांत बजे आदी.

या संघाला शाळेचे क्रीडाशिक्षक सतिशकुमार परदेशी, क्रीडा सहशिक्षक दयानंद दणूरे, हॉकी प्रशिक्षक अजय चाबुकस्वार, हॉकी मार्गदर्शक . जरार कुरेशी यांचे मार्गदर्शन लाभले.यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे व संस्थेचे उपाध्यक्ष अमोल जोशी, सायली जोशी, शितल म्हेत्रे , ममता बसवंती, मुख्याध्यापिका गौरी दातार व प्राचार्य डॉ. गणपती वाघमोडे तसेच पालक शिक्षक व शिक्षकेत्तर वर्गाने अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

दुधनीत कलबुर्गी-कोल्हापूर आणि हुसेनसागर एक्स्प्रेसला थांबा देण्याची मागणी नगराध्यक्ष म्हेत्रे यांनी दिले खासदार माने व वाघमारे यांना निवेदन

राज्यातील महिला परिचरांना दिलासा; मानधनात दुप्पट वाढ !

निवडणुकीतील आश्वासन पूर्ण; वडार गल्लीतील नागरिकांना मूलभूत सुविधांचा दिलासा !

गॅस टंचाईतही अक्कलकोट अन्नछत्राचा महाप्रसाद अखंड; दररोज 25 हजार भाविकांना भोजन

अक्कलकोट पंचायत समितीतमध्ये भाजपचे निर्विवाद वर्चस्व; १३ वर्षांनंतर पुन्हा सत्ता, कार्यकर्त्यांचा जल्लोष !

टी-२० विश्वविजेत्या भारतीय संघाची पुढची मोहिम : आयपीएलपूर्वी इंग्लंडविरुद्ध मालिका ‘या’ तारखेला होणार !

Leave a Comment

Don`t copy text!