---Advertisement---

वाडवडिलांनी आयुष्यभर जे कमवलं ते मुलांनी एका मिनिटामध्ये गमावले – एकनाथ खडसे

Follow Us:
---Advertisement---

जळगाव : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सद्यस्थिती आणि पक्षाचे नाव, चिन्ह गोठवल्यानंतर एकनाथ खडसे यांनी ही टीका केली. ते आज जळगावमध्ये बोलत होते. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भांडणात वर्षानुवर्षाची पुण्याई गोठवली गेली. यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी खंत व्यक्त केली. त्याच बरोबर वाडवडिलांनी आयुष्यभर जे कमवलं ते मुलांनी एका मिनिटामध्ये गमावल्याचेही खडसे म्हणाले.

उद्धव ठाकरेंकडून काही चुका झाल्या असतील. ”धनुष्यबाण मोडला ही वस्तूस्थिती आहे. आता इतरांना दोष देण्यात आता अर्थ नाही. एखादी चूक एवढी मोठी नसावी की, त्यामुळे पक्ष संपून जाईल,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!