---Advertisement---

शंकर रेसिडेन्सीमुळे अक्कलकोट शहराच्या वैभवात भर, हिंडोळे परिवाराच्या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती

Follow Us:
---Advertisement---

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.१८ : अक्कलकोट शहरात स्वामी भक्तांच्या सोयीसाठी हिंडोळे परिवाराच्यावतीने नव्याने बांधण्यात आलेल्या शंकर रेसिडेन्सीमुळे शहराच्या वैभवात निश्चित भर पडेल, असा विश्वास खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी व्यक्त केला. या भक्त निवासाचे उदघाटन खासदार ष.ब्र.डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी व श्रीदेवी हिंडोळे आणि सर्व हिंडोळे परिवारातील जेष्ठ सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, माजी आमदार शिवशरण पाटील, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सतीश पाटील वडकबाळकर, संजय देशमुख, अशपाक बळोरगी,सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, अनिल मंगरूळे, दिलीप सिद्धे, बसलींगप्पा खेडगी, आनंद तानवडे, यशवंत धोंगडे, तुकाराम बिराजदार, मुख्याधिकारी सचिन पाटील, जयशेखर पाटील,राजू बंदीछोडे यांच्यासह सर्व नगरसेवक, व्यापारी, राजकीय, विधी व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून निळकंठ व महेश हिंडोळे यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी सर्वांसाठी प्रीती भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. आलेल्या सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांचे स्वागत नगरसेवक महेश हिंडोळे व परीवाराने केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!