---Advertisement---

अक्कलकोट तालुका गुरव समाज मंडळाच्या अध्यक्षपदी शिवानंद फुलारी तर उपाध्यक्षपदी रमेश फुलारी यांची निवड

Follow Us:
---Advertisement---

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.१८ : अक्कलकोट शहर व तालुका गुरव समाज मंडळाच्या अध्यक्षपदी शिवानंद फुलारी, उपाध्यक्षपदी रमेश फुलारी तर सहसचिवपदी विद्याधर गुरव यांची सर्वांनुमते फेर निवड करण्यात आली. अक्कलकोट येथील श्री मल्लिकार्जुन मंगल कार्यालयात रविवारी जनरल सभा पार पाडली. त्यावेळी ह्या निवडी करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.श्री.काशीनाथ गुरव महाराज हे होते.

यावेळी गेल्या तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अध्यक्ष यांनी जी मेहनत घेतली आहे. अनेक धडाडीचे निर्णय घेतले आहे. या निर्णयाच्या सर्वांनी स्वागत केले.पुन्हा एकदा त्यांची अध्यक्षपदी फेर निवड करण्यात यावे,असा प्रस्ताव अक्कलकोट येथील सेवानिवृत्त वीज कर्मचारी चंद्रकांत गुरव यांनी मांडला.यास समाजातील सर्व ज्येष्ठ मंडळींनी अनुमोदन देऊन उपाध्यक्ष म्हणून रमेश फुलारी, सचिव, सहसचिव विध्याधर गुरव यांची फेरनिवड करण्यात आली. या बैठकीस माजी अध्यक्ष प्रशांत गुरव, उद्योगपती संजय पाटील, मल्लिनाथ पुजारी या निवड समितीने निवड जाहीर केले.

यावेळी बसवराज फुलारी, काशिनाथ फुलारी, स्वामींनाथ फुलारी, हणमंत फुलारी, भोगेश फुलारी, सुनील गुरव, सांगवीचे गुरव, भीमा गुरव, लक्ष्मीकांत पाटील,मधू पाटील, चंद्रकांत गुरव, महादेव पाटील, प्रशांत गुरव, देवानंद फुलारी, चंद्रकांत पुजारी, ज्ञानेश्वर फुलारी, संजय गुरव,सचिन फुलारी, शरणप्पा फुलारी, विश्वनाथ गुरव, राजकुमार पुजारी, डॉ. फुलारी, स्वामींनाथ गुरव, मलकप्पा गुरव, रमेश फुलारी कोन्हाळी, उदय पाटील, दीपक गुरव, अशोक पाटील, विजय गुरव आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!