---Advertisement---

भुसावळ पालिकेत खडसे गटाला मोठा धक्का, माजी नगराध्यक्षांसह १० नगरसेवकांना ६ वर्षांसाठी अपात्र

Follow Us:
---Advertisement---

जळगाव : भुसावळ पालिकेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी नगराध्यक्षांसह १० नगरसेवकांना ६ वर्षांसाठी अपात्र घोषित करण्यात आलं आहे. या नगरसेवकांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडून आल्यानंतरही राजीनामा न देता राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

१७ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रवादीचे नेते आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला होता. याबाबत भाजप नगरसेविका पुष्पा बतरा यांनी २८ डिसेंबर २०२१ रोजी सदर माजी नगराध्यक्ष व नगरसेविकांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथ खडसे यांच्या सोबत भुसावळ पालिकेतील नगरसेवकांनी देखील भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी पाच वर्षांसाठी या नगरसेवकांना अपात्र ठरवले होते. अपात्र नगरसेवकांतर्फे या निर्णयाविरोधात नगरविकास विभागाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांनी याप्रकरणी अंतिम सुनावणी करत ही याचिकादेखील फेटाळली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!