---Advertisement---

राज्यातील मंत्र्याचे राजीनामे मागाल तर आदित्य ठाकरे यांचे पार्ट्यामधल्या ‘’ते‘’ व्हिडीओ दाखवू, शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी दिला इशारा

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : राज्यातील मंत्र्याचे राजीनामे मागाल तर आदित्य ठाकरे यांचे पार्ट्यामधल्या दारू पितानाचे व्हिडीओ दाखवू असा थेट इशारा शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी दिला आहे. गेल्या आठवड्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे पीक नुकसान पाहणीच्या बीड दौऱ्यावर गेले होते. यावेळी बीडमधील रेस्ट हाऊसमध्ये कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत कार्यकर्ते चहा घेत होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी चहा नको म्हटले. त्यावर अब्दुल सत्तार यांनी तुम्ही दारू पिता का? असं विचारलं. अब्दुल सत्तारांचा हाच व्हिडिओ काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट केला होता. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मागणी केली होती. त्यानंतर आता शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यात आले आहे.

शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांचा दारुबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युवा सेना प्रमुख माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली होती. “ज्यांना नाईट लाईफचं आकर्षण आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचं नाटक बंद करावं. आदित्य ठाकरे मिटिंग सुरू असताना दारुचे व्हिडीओ आहे, त्यांच्या पार्ट्यांचे व्हिडीओ आहेत. तुम्हाला किती व्हिडीओ बघायचे आहेत?”अशा शब्दात किरण पावस्कर यांनी टीका केली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!