---Advertisement---

पत्रकारांची खिल्ली उडवणाऱ्या आमदार पराग शाह यांचा तीव्र शब्दात निषेध ; टीवीजेए संघटनेने केला निषेध

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : महाराष्ट्र आणि मुंबईत येऊन 500 कोटींच्या मालमत्तेची कमाई ( अधिकृत माहिती नुसार) केलेले भाजपा आमदार पराग शाह यांनी “चाय बिस्कुटवाले पत्रकार झाले HMV पत्रकार ” असे नवे पत्रकारांचे नामकरण केले आहे. पत्रकारांची अशी खिल्ली उडवणाऱ्या आमदार पराग शाह यांचा आम्ही अत्यंत तीव्र शब्दात निषेध करतो,असे पत्रकार संघाने म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील HMV पत्रकार गटात आता चाय बिस्कुटवाले पत्रकार घालून जी गोळाबेरीज आमदार पराग शाह करीत आहेत त्यामध्ये गुजराती, मारवाडी, जैन असे सगळे पत्रकार येतात की फक्त महाराष्ट्रातील मराठी पत्रकारच आहेत, याचा स्पष्ट खुलासाही आमदार महोदयांनी एकदा करावा. म्हणजे सगळे चित्र स्पष्ट होईल.

भाजपाचे आमदार मिहीर कोटेचा यांनी “मराठी दांडीया” या भाजपाच्या उपक्रमात मराठी पत्रकारांचा केलेला अपमान त्यानंतर आमदार पराग शाह यांनी मांडलेली ही भूमिका हे सगळे ज्या पद्धतीने सुरु आहे त्याची गोळाबेरीज पत्रकार म्हणून तमाम पत्रकारीता करीत आहेच. असो पराग शाह यांच्या पक्षाला या सगळ्यातून राजकीय फायदा होत असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा!

पत्रकारांची संघटना म्हणून आम्ही या गोष्टींचा अत्यंत तीव्र शब्दात निषेध करतो आणि पत्रकार संघटनांनी हे वेळीच रोखण्यासाठी सजग व्हावे अशी विनंती ही करतो, असे विनोद जगदाळे – अध्यक्ष, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन मुंबई यांनी म्हटले आहे.

यावेळी राजेश माळकर- सचिव, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन, मुंबई उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!