ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर, आव्हाड यांनी ट्विट करून दिली माहिती

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांना विवियाना मॉलमध्ये प्रेक्षकाला झालेल्या मारहाण प्रकरणी अटक करण्यात आली होती. आव्हाड यांच्यासह एकूण बारा जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडण्यासाठी गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी आव्हाड यांना ठाण्यातील वर्तक नगर पोलिसानी अटक केली होती. त्यांना आज न्यायालयात हजर केले गेले. आव्हाड यांना न्यायालयीन कोठडी सुनावताच त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!