---Advertisement---

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाची वृत्त ही अफवा  – वृषाली गोखले

Follow Us:
---Advertisement---

पुणे – ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाची अफवा काल रात्री पसरली होती. मात्र त्यांच्यावर अजूनही उपचार सुरु आहेत, अशी माहिती त्यांची पत्नी वृषाली यांनी दिली आहे. सरकारी ट्विटर हॅण्डलपासून अजय देवगण, जावेद जाफरी यासारख्या सेलिब्रिटींनीही रात्री उशीरा विक्रम गोखलेंना श्रद्धांजली अर्पण करणारी ट्विट केल्याने गोखलेंच्या मृत्यूसंदर्भातील संभ्रम निर्माण झाला होता. याचसंदर्भात स्पष्टीकरण देताना पत्नी वृषाली यांनी ही माहिती दिली आहे.

वृषाली गोखले म्हणाले की, विक्रम गोखलेंच्या निधनाचं वृत्त ही अफवा असून ते सध्या व्हेंटीलेटरवर आहेत. काल सायंकाळी ते कोमामध्ये गेले. त्यानंतर ते स्पर्शालाही प्रतिसाद देत नसून त्यांना सध्या व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे, ते प्रतिसाद देत आहेत की नाही यासंदर्भात डॉक्टर निर्णय घेतील,” असं विक्रम गोखेलेंच्या पत्नी ऋषाली यांनी सांगितलं आहे.

गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवल्याच्या बातम्या व्हायरल झाल्यानंतर कुटुंबियांनी या अफवा असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्त सोशल मीडियावर पसरल्यानंतर सिनेसृष्टीतील कलाकारांनी ट्विटरवरुन पोस्ट केल्याने विक्रम गोखले हे सोशल मीडियावर चर्चेत आले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!