---Advertisement---

मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का ; कृष्णा हेगडे यांचा शिंदे गटात प्रवेश

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना कृष्णा हेगडे यांचा शिंदे गटातील पक्षप्रवेश ठाकरेंसाठी मोठी धक्का मानला जात आहे. कृष्णा हेगडे शिंदे गटात प्रवेश करताच त्यांना उपनेतेपद आणि प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी काल आपल्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.

शिंदे सरकार ठाकरे गटाला वारंवार धक्क्यांवर धक्के देत आहे. शिवसेनेत फूट पाडल्यानंतर अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला. यातच आता अजून एक मोठा धक्का ठाकरे गटाला बसला आहे. माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबईतील विलेपार्ले भागात कृष्णा हेगडे यांचा बालेकिल्ला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!