---Advertisement---

डॉ. उदयकुमार म्हेत्रे यांना सोलापूर विद्यापीठाची पीएचडी

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील डॉ. उदयकुमार म्हेत्रे यांना सोलापूर विद्यापीठाची पी.एच.डी. पदवी मान्यवरांच्या हस्ते नुकतीच प्रदान करण्यात आली. दुधनी नगरपरिषदेचा इतिहास (१९१० ते २०१२) हा त्यांचा विषय होता. डॉ.विलास निंबाळकर, बुर्ला महाविद्यालय, सोलापूर यांनी मार्गदर्शन केले. संशोधन केंद्र हे सोलापूर विद्यापीठ होते.

संशोधक डॉ. म्हेत्रे हे वैद्यकीय व्यावसायिक आहेत केवळ इतिहास विषयाची आवड म्हणून हे संशोधन पूर्ण करून शिक्षण श्रेत्रातील विद्यावाच्चस्पती ही सर्वोच्च पदवी मिळवली.विशेष बाब म्हणजे संशोधकाने ज्या दुधनी नगरपरिषदेचा विषय संशोधनासाठी निवडला होता त्याच नगरपरिषदेचे ते नगरसेवक आहेत. नुकत्याच झालेल्या सोलापूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.डॉ.म्हेत्रे यांच्या यशाबद्दल तालुक्यातून सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!