---Advertisement---

अक्कलकोट तालुक्यात एकाच दिवशी दोन सख्ख्या भावांचे निधन ; भोसगे येथील दुर्दैवी घटना

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२५ : अक्कलकोट तालुक्यातील भोसगे येथे एकाच दिवशी दोघा सख्ख्या भावाचे निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अनोख्या घडलेल्या घटनेची चर्चा तालुक्यात सुरू आहे. मृत्यू कोणाला सांगून येत नाही पण भोसगेमध्ये जी घटना घडलेली आहे ती दैवी आहे की काय अशी चर्चा अंत्यसंस्काराच्यावेळी नागरिकांमध्ये सुरू होती. मल्लणा जनगोंडा व बसवंतराय जनगोंडा असे मरण पावलेल्या दोघा भावांची नाव आहेत. हे दोघेही आजारी होते. मलकणा यांचे वय – ९० होते तर बसवंतराय यांचे वय -८५ होते. मलकणा यांचे शनिवारी रात्री ११ वाजता निधन झाले तर या निधनाचा धक्का बसून बसवंतराय यांचे पहाटे ४ वाजता निधन झाल्याची माहिती उपस्थितांनी दिली आहे.

मलकणा यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे तर बसवंतराय यांच्या पश्चात पत्नी, चार मुले,सुने, नातवंडे असा परिवार आहे. अशा घटना दुर्मिळ आहेत. पाच वर्षांपूर्वी अक्कलकोट तालुक्यातील हंजगीमध्ये पाटील परिवारामध्ये अशा प्रकारची घटना घडली होती. त्यानंतर आता भोसगे येथे घडली आहे. या घटनेची तालुक्यात चर्चा सुरू आहे. या दोघा भावांवर एकाच वेळी भोसगे व परिसरातील ग्रामस्थांच्या उपस्थित ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!