---Advertisement---

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात

Follow Us:
---Advertisement---

परळी : राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला आहे. अपघातात धनंजय मुंडे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

परळीमध्ये आज सकाळी हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे हे स्वत: कार चालवत होते. कारवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. यात धनंजय मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार लागला आहे. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईत हलवण्यात येणार असल्याचं कळतं.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!