---Advertisement---

वळसंगचे जेष्ठ नेते शिवलिंगप्पा कोडले यांचे निधन,उद्या होणार अंत्यसंस्कार

Follow Us:
---Advertisement---

वळसंग : वळसंग (तालुका दक्षिण सोलापूर ) येथील ज्येष्ठ नागरिक व माजी जिल्हा परिषद सदस्य शिवलिंगप्पा करबसप्पा कोडले ( वय ८२ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या करारी स्वभावाने ते परिचीत होते मार्केट कमीटीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ,तीन मुले,सुना नातवंडे असा परिवार आहे. वळसंगचे सलग २१वर्षे सरपंच होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असून काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्षपदी सलग पंधरा वर्षे त्यांच्याकडेच होते. माजीमंत्री आनंदराव देवकते यांचा उजवा हात म्हणून ते ओळखले जात असत . त्यांची अंत्ययात्रा उद्या दुपारी एक वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!