---Advertisement---

तांबे पिता- पुत्रांसाठी काँग्रेसच्या हायकमांडने दिले महाराष्ट्र काँग्रेस कमिटीला ‘हे’ आदेश

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी करणाऱ्या सत्यजीत तांबेंना तातडीनं पक्षातून निलंबित करण्याचे आदेश काँग्रेसच्या हायकमांडने महाराष्ट्र काँग्रेस कमिटीला दिले आहेत. त्यामुळं आता तांबे कुटुंबियांसह काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या अचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुधीर तांबे यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरून पक्षाविरोधात बंडखोरी केल्यामुळं त्यांच्याविरोधात पक्ष कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीआधीच आमदार सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांनी घेतलेल्या भूमिकांमुळं काँग्रेस पक्ष आणि बाळासाहेब थोरात यांची चांगलीच गोची झाली आहे. त्यानंतर आता या प्रकरणाची केंद्रीय पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली असून पक्षश्रेष्ठींनी सत्यजीत तांबे यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत झालेल्या राजकीय घडामोडींविषयी सत्यजीत तांबे १८ जानेवारीला पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!