---Advertisement---

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने महाआरोग्य शिबीराचे आयोजन ; उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Follow Us:
---Advertisement---

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्यावतीने महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील जांभळीनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात हे शिबीर होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची उद्या दिनांक २७ जानेवारी रोजी जयंती आहे. या निमित्ताने महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यंमत्री शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात उद्धव ठाकरे यांचा पहिलाच दौरा होणार असून या दौऱ्यात ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे ठाणे भेटी दरम्यान शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आनंद आश्रमात जाणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!