---Advertisement---

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना चपळगाव ग्रामपंचायतीतर्फे अभिवादन

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.६ : गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना चपळगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने सोमवारी अभिवादन करण्यात आले. प्रथम पुण्य स्मरणानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ग्रामस्थांच्यावतीने प्रतिमा पूजन युवा नेते बसवराज बाणेगाव व शिव छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज इंगुले यांच्या हस्ते करण्यात आले.गानसम्राज्ञी लता मंगेशकर हे भारताला मिळालेले वैभव होते ते आज हरपले आहे त्यांच्या गाण्याची आजही संपूर्ण भारतावर छाप आहे, अशी गाण कोकीळा पुन्हा होणे नाही. कधीही न भरून येणारे संगीत विश्‍वाचे नुकसान यामुळे झाले आहे, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

यावेळी श्रावण गाजधाने, परमेश्वर वाले, मल्लिनाथ सोनार, नागेश बिराजदार, सुरेश सुरवसे, सुरेश नारायणकर, राजेंद्र कोळी, सचिन म्हेत्रे, उमेश सोनार, विष्णूवर्धन कांबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!