---Advertisement---

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याला उत्साहात प्रारंभ

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट दि,१४ : मराठी भाषेला सतत अमर ठेवण्यासाठी आणि मराठी भाषेचे सौंदर्य,महत्व सांगण्यासाठी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आयोजित केल्याची माहिती आयोजक स्वामीनाथ हरवाळकर यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी प्राचार्या गौरी दातार ह्या होत्या.सोलापूर जिल्ह्यातील सर्वच शाळा आणि महाविद्यालये यामध्ये सहभागी होणार आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून या पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आले. पंधरवड्याचे समारोप कानडी शाळेत करण्यात येणार असल्याचे हरवाळकर यांनी सांगितले. विश्वगुरू महात्मा बसवेश्वर साहित्य परिषद ,महाराष्ट्र यांच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.

कानडी सीमावरती भागात मराठी जनजागृतीचे यंदाची तपपूर्ती वर्ष आहे. दरवर्षी २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हा पंधरवडा हि मराठी भाषा दिना चे अवचित्य साधून आयोजित केला आहे. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरु झाल्याची माहिती अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांनी दिली.

Watch Our Latest Video

पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सचिन खुडे यांनीही मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले. पसायदानाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. समारोप पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली.यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!