---Advertisement---

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये प्राणघातक हल्ला

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दादर भागातील माजी नगरसेवक व प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला. देशपांडे हे सकाळी दादर येथील शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करत असताना अज्ञात हल्लेखोराने त्यांचावर हल्ला केला.

या हल्ल्यात संदीप देशपांडे जखमी झाल्याची माहिती मिळत असून त्यांना तातडीनं हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून हा हल्ला राजकीय वैमन्यस्यातून झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संदीप देशपांडे हे आज नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला शिवाजी पार्क येथे गेले होते. यावेळी मॉर्निंग वॉक करत असतानाच अचानक काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना रॉड आणि स्टम्पने बेदम मारहाण करण्यात आली.

हल्लेखोर चेहऱ्याला मास्क लावू आलेले होते. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात देशपांडे जखमी झाले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी वेगानं तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, ही घटना राजकीय वैमस्यातून झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!