---Advertisement---

सासवड-नारायणपूर-कापूरहोळ रस्ता ; नुसते अश्वासन नको, काम कधी पूर्ण होणार ती तारीख सांगा – विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

Follow Us:
---Advertisement---

मुंबई, दि. 16 : पुणे जिल्ह्यातला नॅशनल हायवे 962 ते पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा पर्यटनाच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा सासवड-नारायणपूर-कापूरहोळ रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत सुध्दा अनेक तक्रारी आहेत, याची चौकशी करुन या रस्त्याच्या कामाबाबत नुसते अश्वासन नको तर हे काम नक्की किती तारखेला पूर्ण होणार ती तारीख सांगा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, पुणे जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र नारायणपूर आणि केतकावळे येथील प्रतिबालाजी म्हणून प्रसिध्द असणाऱ्या मंदिरात दर्शनाला हजारो भाविक येत असतात. तसेच स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थळ असणाऱ्या पुरंदर किल्ल्याला जोडणारा सासवड-नारायणपूर-कापूरहोळ हा रस्ता आहे. हा रस्ता नॅशनल हायवे 962 आणि पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गाला जोडतो.

या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत सुध्दा अनेक तक्रारी आहेत. या कामाच्या दर्जाची योग्य यंत्रणेकडून चौकशी करावी. तसेच या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित आहे, मात्र या रस्त्याच्या कामाचे नुसते आश्वासन नको तर ते काम किती तारखेपर्यंत पूर्ण होणार याची माहिती देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!