---Advertisement---

कपिल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गोकुळ शुगर धोत्री येथे कार्यक्रम

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर कपिल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा भव्य सत्कार सोहळा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती चेअरमन दत्ता शिंदे यांनी दिली.

मंगळवार दि. ४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता कारखाना कार्यस्थळावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. यात सर्व शेतकरी बांधवांना गाळप हंगाम यशस्वी केल्याबद्दल स्नेहभोजन आयोजित करण्यात आले आहे. यावर्षी कारखान्याने गाळप हंगाम यशस्वी करून शेतकऱ्यांना वेळेत सर्व बिले अदा केली. त्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यापुढे अशाच पद्धतीने कारखाना बिले वेळेत देईल,अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

यावेळी व्हाईस चेअरमन विशाल शिंदे, एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर प्रदीप पवार वर्क्स मॅनेजर राजकुमार लवटे, केन मॅनेजर रामचंद्र शेंडगे, प्रोसेस मॅनेजर एस.पी भावसार, शेती अधिकारी फक्रुदिन जहागीरदार, मोट्याळचे सरपंच कार्तिक
पाटील, अभिजीत गुंड, कुरनूरचे सरपंच व्यंकट मोरे, राजू चव्हाण आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!