---Advertisement---

हजरत पीर ख्वाजा दाऊद दर्गाच्या उरुसास गुरुवारपासून प्रारंभ

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट शहरातील ग्रामदैवत हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत पीर ख्वाजा दाऊद दर्गाच्या उरुसास गुरुवार दि.२२ जूनपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पहिल्या दिवशी गंध मिरवणूक,२३ जून रोजी दिवे (यात्रा) तर २४ जून रोजी जियारत असल्याची माहिती दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष एजाज मुतवल्ली यांनी दिली.उरूस निमित्त दर्गा परिसरात नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली असून उत्सव कालावधीत तिन्ही दिवस भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.यात्रा उत्सव पार पाडण्यासाठी दर्गा ट्रस्टचे संस्थापक हाजी नसरोद्दीन मुतवल्ली,खलीलअहमद मुतवल्ली,सैपन मुजावर, माजिद गौर,इम्रान मुतवल्ली,मझहर मुजावर,मतीन पटेल, मुनीर मुजावर,अल्तमश घोळसगावकर,अस्लम बोरोटी आदी
सहकार्य करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!