---Advertisement---

‘हास्य संजे’ कन्नड मनोरंजनात्मक कार्यक्रमात श्रोते झाले मंत्रमुग्ध,गुरुपौर्णिमा उत्सव कार्यक्रम

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : महाराष्ट्र व कर्नाटक सीमावर्ती भागातील कन्नड भाषिक रसिकांना आपल्या खास शैलीत कर्नाटकचे प्रसिद्ध हास्य सम्राट गंगावती प्राणेश यांनी ‘हास्य संजे’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमात श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३६ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, मंगळावर सायंकाळी ७ वा. ‘हास्य संजे’ कन्नड विनोदी कार्यक्रम सादरकर्ते – कॉमिडी किंग गंगावती प्रणेश, नरसिंह जोशी आणि बसवराज महामनी कर्नाटक ह्या कार्यक्रमाने पाचवे पुष्प संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, भाजपा तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती अप्पासाहेब पाटील, तालुका कृषी अधिकारी हर्षद निगडे-देशमुख, उद्योगपती विलास कोरे, अभियंता अशोक येणगुरे, शरणप्पा पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे हे देखील उपस्थित होते.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा व कलाकारांचा सत्कार न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व मंडळाच्या पदाधिकारी यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले.

यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई भोसले, अर्पिताराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, स्मिता कदम, पल्लवी नवले, कविता वाकडे, क्रांती वाकडे, संगीता भोसले, अंजना पवार, उज्वला भोसले, कोमल क्षिरसागर व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले, अँड.संतोष खोबरे, ओंकारेश्वर उटगे, राजेंद्र लिंबितोटे, प्रा. प्रशांत शिंपी, प्रथमेश इंगळे, स्वामीराव मोरे, योगेश पवार, रोहित खोबरे, श्रीकांत मलवे, अतिश पवार, राजु नवले, सागर गोंडाळ, पिटू शिंदे, निखील पाटील, प्रवीण घाटगे, गोटू माने, अभियंता किरण पाटील, अमित थोरात, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब पोळ, अरविंद शिंदे, प्रथमेश पवार, धनंजय गडदे, अप्पू कलबुर्गी, सौरभ मोरे, वैभव मोरे, राहुल इंडे, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, महादेव अनगले, सनी सोनटक्के व राजेंद्र पवार, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, प्रसन्न बिराजदार, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, अनिल बिराजदार, शरद भोसले, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, गोविंदराव शिंदे, आकाश शिंदे, राहुल बकरे, मुबारक कोरबू, विक्रांत घोडसे, फहीम पिरजादे, सुमित कल्याणी, स्वामिनाथ गुरव, अशोक किणीकर, धानप्पा उमदी व सिद्धाराम टाके, केदार माळशेट्टी, बालाजी पाटील, अनिल शिंदे, सिद्धाराम त्रिगुळे, रामचंद्र समाणे, बाबुराव जाधव, दत्तात्रय माने, सदाशिव सुरवसे, भीमाशंकर सुरवसे, अप्पू उमराणीकर, महादेव होळ्ळा, शुभम भिंगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले. उत्कृष्ठ लाईट व्यवस्था अराद्य इलेक्ट्रिकल यांनी केले.

गुणीजन गौरव :

यामध्ये विशेषगौरव पुरस्कार अक्कलकोट नगर परिषदेचे सेवानिवृत्त नगररचनाकार विठ्ठल तेली, व कृषी सहायक योगेश कटारे, भोसागे तांडा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सिद्धप्पा हारके, अँड.सुनील बोराळकर, शिवछत्रपती ग्रामविकास तरुण मंडळ शावळ व पान मंगरूळचे कोतवाल बंदेनवाज दाफेदार, मुंबई पोलीस कु. मधुरा, कु.रेवनसिद्द फुलारी यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

गुणवंत विद्यार्थी गौरव :

तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ९ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.

आजचे कार्यक्रम

बुधवार दि.२८ जून रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘किर्तन’ राष्ट्रीय किर्तनकार व समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर (संगमनेर, अकोलेकर) यांचा कार्यक्रम होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!