---Advertisement---

छत्तीसगडमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी ; काही वेळात होणार निकाल !

By team
On: December 3, 2023 9:47 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील काही राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली असून आज अनेक ठिकाणी मतमोजणी सुरु असून यात छत्तीसगड राज्यातील विधानसभा निवडणुकीकडे समस्त देशाचे लक्ष लागले आहे. या राज्यात काँग्रेस आपली सत्ता कायम राखण्यात यशस्वी होईल की भाजपा पुन्हा एकदा मुसंडी मारेल, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

छत्तीसगडमधील ९० जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडलं. ७ नोव्हेंबर रोजी येथे पहिल्या टप्यातील मतदान पार झालं; तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान १७ नोव्हेंबर रोजी पार पडलं. छत्तीसगडमधील ९० जागांवर लढणाऱ्या हजारो उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत कैद झालं आहे. यावर आज ३ डिसेंबर मतमोजणी होणार असून जनतेनं कोणत्या उमेदवाराला कौल दिला? हे पुढील काही तासांत स्पष्ट होणार आहेत. छत्तीसगडमध्ये सध्या काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असून भाजपाला धोबीपछाड दिल्याचं दिसत आहे. आताच्या घडीला काँग्रेस ४८ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा ३२ जागांवर आघाडी घेतली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!