ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आनंदाची बातमी : ‘या’चारचाकीवर मिळणार लाखो रुपयांची सूट !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

अनेक लोकांनी दिवाळीचा उत्साहात आपल्या घरी चारचाकीचे आगमन केले असेल पण ज्या कुणी चारचाकी घेतली नसेल त्यांच्यासाठी एक मोठी संधी येत्या काही दिवसात येणार आहे. काही दिवसातच नववर्ष 2024 सुरु होईल होईल. अशा वेळी या मुहूर्तावर जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

कारण तुम्ही नववर्षात Hyundai कार्सवर बंपर ऑफर मिळवू शकता. यामध्ये तुम्हाला 3 लाखांपर्यंत सूट देण्यात येणार आहे.
यामध्ये तुम्हाला Kona EV वर उपलब्ध कमाल सवलत 3 लाख रुपयांपर्यंत आहे. त्याचप्रमाणे, कंपनी Grand i10 Nios वर 48000 रुपयांपर्यंत आणि Aura वर 33000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. या ऑफरमध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस, विशेष सवलत आणि इतर सवलतींचा समावेश आहे. तसेच कंपनी 16 जानेवारी 2024 रोजी Hyundai Creta चे नवीन अपडेटेड व्हर्जन लॉन्च करणार आहे.

सर्व इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध
आगामी वर्षात विक्री वाढवण्यासाठी कंपनी ही ऑफर देत आहे. माहितीनुसार, Hyundai i20 आणि i20 N-Line वर 50000 रुपयांपर्यंत सूट आहे. याशिवाय जुन्या i20 च्या DCT प्रकारावर 40000 रुपये आणि Sportz MT वर 35000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. दक्षिण कोरियाची कंपनी ह्युंदाई हॅचबॅक, एसयूव्ही आणि सेडान सारख्या प्रत्येक सेगमेंटच्या कारवर सूट देत आहे. कंपनीच्या CNG Aura ला आजकाल जास्त मागणी आहे. त्यामुळे या कारवार देखील तुम्हाला चांगली सूट मिळणार आहे.

कारमध्ये 1197 सीसी इंजिन
कंपनीच्या हाय डिमांड कार Hyundai Aura बद्दल बोलायचे तर, तिचे बेस मॉडेल 6.44 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. या फॅमिली सेडान कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल होल्ड सारखी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. या कारमध्ये तुम्हाला 1197 cc इंजिन मिळणार आहे. कारमध्ये वायरलेस फोन चार्जर आणि सहा मोनोटोन कलर पर्याय आहेत. ही कार ऑटो क्लायमेट कंट्रोल, आठ इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह येते.

कारमध्ये 528 लीटर बूट स्पेस
Hyundai Verna मध्ये 1.5-लीटर पेट्रोल इंजिन आहे. या सेडान कारमध्ये 528 लीटरची बूट स्पेस आहे. कारमध्ये सहा एअरबॅगसह 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. याचे चार प्रकार आणि 7-स्पीड ट्रान्समिशन आहे. Hyundai Verna मध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन ट्रान्समिशन आहेत. Hyundai Verna चे बेस मॉडेल 10.89 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये दिले जात आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बजेटनुसार कार खरेदी करू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!