---Advertisement---

भरधाव वाहनाच्या धडकेत कारखान्यातील कामगार ठार !

By team
On: December 19, 2023 10:53 AM
Follow Us:
---Advertisement---

पंढरपूर : वृत्तसंस्था

साखर कारखान्यातील काम संपल्यानंतर घराकडे निघालेल्या कामगाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि.१८) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर – वेळापूर मार्गावरील वाडीकुरोली येथे घडला.विश्वजीत ज्ञानेश्वर सावंत (वय २२, रा. पिराची कुरोली) असे मयत कामगाराचे नांव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विश्वजीत हा खर्डी येथील सीताराम महाराज साखर कारखान्यात हंगामी कामगार म्हणून कार्यरत होता. नेहमीप्रमाणे रविवारी (दि.१७) सायंकाळी ७ वाजता तो आपल्या बजाज प्लॅटीना मोटारसायकलवरून (एम.एच. १३ / ई.डी. २५६२) पिराची कुरोली येथून खर्डी येथील कारखान्यात कामावर गेला होता.

पहाटे ४ वाजता काम संपल्यानंतर परत तो गावाकडे निघाला. दरम्यान, पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास वाडीकुरोली येथील कै. वसंतराव काळे महाविद्यालयासमोरील रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्याच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. यामध्ये रस्ता दुभाजकावर आदळल्याने गंभीर जखमी होऊन जागीच तो ठार झाला. याबाबतची फिर्याद वडील ज्ञानेश्वर सावंत यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!